Wednesday, 25 January 2017

सुई-दोरा अभियान_चला भारत जोडूया चे उद्देश

१) निराधार,बेरोजगार,गरजू व विधवा महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देवून रोजगार उपलब्ध करून देणे.
२) विविध सरकारी निवासी शाळा ,आश्रमशाळा येथील विद्यार्थ्यांना सुई-दोर्याचा वापर करून स्वतःचे कपडे कसे शिवायचे ,त्याला बटण कसे लावायचे व टाकाऊ कापडापासून हातरुमाल व पिशवी कशी शिवायची याचे प्राथमिक प्रशिक्षण देणे.
३) उघड्या गोरगरीब लोकांपर्यंत अंग झाकण्यासाठी आपल्या जवळील थोडी फाटकी व वापरात नसलेली वस्त्र शिवून पुरविणे.
४) विविध सामाजिक संस्था व समाजातील दाते यांच्या सहाय्याने बेरोजगार व दिव्यांग व्यक्तींना शिलाई मशीन ,दोरा ,कापड मिळवून देणे.
५) सरकारी हॉस्पिटल,रेल्वे,एस टी,बसेस,सरकारी संस्था मधील पलंग,खुर्ची,पडदे व इतर वस्तू शिवणे किंवा शिवूण घेणे.
६) वापरलेल्या वह्यांमधील कोरी पाने जमवून त्यांच्या वह्या तयार करून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे.
७)पर्यावरण पुरक कागदी किंवा कापडी पिशव्यांची निर्मीती करणे.





No comments:

Post a Comment