Sunday, 5 March 2017

आपलं समाधान शासनाचा फायदा...

सुई-दोरा आपल्या बॅगेत सोबत ठेवला तर आपण अशाप्रकारे रेल्वेने अथवा एस.टी ने प्रवास करीत असतांना डोळयांना दिसणारी फाटकी सीट सहज शिवू शकतो...यात आपलं समाधान शासनाचा फायदा...

Add caption





महाराष्ट्र एक्सप्रेस मधील परिस्थिती 

सुई-दोरा अभियानाचे उद्देश

१) निराधार,बेरोजगार,गरजू व विधवा महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देवून रोजगार उपलब्ध करून देणे.
२) विविध सरकारी निवासी शाळा ,आश्रमशाळा येथील विद्यार्थ्यांना सुई-दोर्याचा वापर करून स्वतःचे कपडे कसे शिवायचे ,त्याला बटण कसे लावायचे व टाकाऊ कापडापासून हातरुमाल व पिशवी कशी शिवायची याचे प्राथमिक प्रशिक्षण देणे.
३) उघड्या गोरगरीब लोकांपर्यंत अंग झाकण्यासाठी आपल्या जवळील थोडी फाटकी वापरात नसलेली वस्त्र व  जुनी दप्तर शिवून पुरविणे.
४) विविध सामाजिक संस्था व समाजातील दाते यांच्या सहाय्याने बेरोजगार व दिव्यांग व्यक्तींना शिलाई मशीन ,दोरा ,कापड मिळवून देणे.
५) सरकारी हॉस्पिटल,रेल्वे,एस टी,बसेस,सरकारी संस्था मधील पलंग,खुर्ची,पडदे व इतर वस्तू शिवणे किंवा शिवूण घेणे.
६) वापरलेल्या वह्यांमधील कोरी पाने जमवून त्यांच्या वह्या तयार करून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे.
७)पर्यावरण पुरक कागदी किंवा कापडी पिशव्यांची निर्मीती करणे.